नजरेतुन व्यक्त होणाऱ्या भावनांना समजुन घ्यायला शब्दांची गरज नसते...
#जिंदगीडॉटकॉम
छोट्या गोष्टींमधला आनंद ओळखता आला की आयुष्याच्या प्रवास सुखाचा होतो...
व्यवस्था सुधारल्याशिवाय अवस्था सुधारत नाही...
मनसोक्त जगणाऱ्यांना प्रतिष्ठेचं ओझं कधीच आडवं येत नाही...
जगातलं कोणतंच दुःख माणसाच्या सहनशीलतेपेक्षा मोठं नसतं...
चोरुन बघणाऱ्यांवर एक दिवस दुरुन बघण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही...
प्रत्येक मानवी मनाला स्वतःचं असं एखादं भावनिक विश्व असतं...
मौन हे शाब्दिक हल्ले निष्प्रभ करणारे प्रभावी शस्त्र आहे...
आईच्या ममतेवर आणि बापाच्या क्षमतेवर कुणालाच संशय नसतो...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम