सुखी माणसाचा सदरा समाधानी माणसाच्या अंगावरच सापडतो...
#जिंदगीडॉटकॉम
जगण्यातले क्षण साठवल्याशिवाय आयुष्यभराच्या आठवणी निर्माण होत नाहीत...
भावना लपविण्याचा धडपडीत चेहरेच जास्त बोलत असतात...
ध्येय सुंदर असेल तर ध्येयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवरसुद्धा प्रेम होतं...
जिंदगीच्या दुखण्यावर समाधानासारखं दुसरं औषध नाही...
ध्येयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर प्रेम करता आलं की ध्येयाच्या पलीकडचाही प्रवास करता येतो...
वागण्यात खोटेपणा स्वीकारुन जगण्यात मोठेपणा मिळवता येत नाही...
जगण्याच्या धडपडीत स्वतःचाच आधार असणं महत्वाचं असतं...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम