स्वतःला सिद्ध करता येण्यासारखं मोठं यश नाही...
#जिंदगीडॉटकॉम
जिद्दच माणसाला आयुष्यात उभी करते...
स्वतःच्या ताकदीवर भरवसा असणाऱ्यांना यश सहज खेचुन आणता येते...
आनंद हा माणसाच्या जगण्यातील सर्वात मोठा सण आहे...
खिडकीतुन दिसतं त्यापेक्षा मोठं जग असतं...
आयुष्यात भेटणारा प्रत्येक चेहरा अनुभव देऊन जातो...
वाटा कुठल्या जरी असल्या तरी त्या सावलीला धरुन ठेऊ शकत नाहीत...
जगण्यात चटके सोसल्याशिवाय त्याला जीवन म्हणुन ओळख प्राप्त होत नाही...
वेदना समजणाऱ्यांनाच वेदनांचा अर्थ समजु शकतो...
जगणं कष्टाचं असलं तरी निराशेचं नाही...
कुतुहलच माणसाला शहाणपणाकडे घेऊन जाते...
अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर उपेक्षेचीही भीती राहत नाही...
“जाऊ दे” ह्या दोन शब्दात कितीही कठीण परिस्थिती हाताळण्याची ताकद असते...
प्रत्येकाची आनंदाची व्याख्या स्वतःपुरती वेगवेगळी असते...
स्तुतीची ऊब माणसाला कायम हवीहवीशी वाटते...
समाधानाशिवाय सुखाची व्याख्या करता येत नाही...
अनुभवांवर बोलण्यासाठी आधी अनुभव देणारे चेहरे वाचावे लागतात...
माणुसकीचा चेहरा दिसेपर्यंत त्याचा शोध घ्यावा लागतो...
जगण्याला आधार मिळाला जीवनात निराधार व्हायची भीती राहत नाही...
गर्दीत दिसणारे सगळे चेहरे सारखेच असतात...
आयुष्याची चव चाखल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही...
स्वतःला स्विकारता आलं तरच स्वतःला बदलता येतं...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम