Tuesday, 31 July 2018

जाहिरात

स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारं जगात कुणीच भेटत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 18 July 2018

रचना

मनाच्या मोकळ्या कप्प्यात आयुष्यातल्या आठवणी रचुन ठेवायच्या असतात...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 16 July 2018

व्यथा

व्यथांची कथा समजुन घेण्यासाठी त्यांच्याशी एकरुप व्हावं लागतं...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 13 July 2018

थेंब

पडणाऱ्या प्रत्येक थेंबात त्याचं स्वतःचं तळं सामावलेलं असतं...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 12 July 2018

श्रोता

आपलं शब्द समजुन घेण्यासाठी प्रत्येकालाच एका चांगल्या श्रोत्याची गरज असते...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 11 July 2018

माणुस

माणसाचं दिसणं बदललं म्हणुन त्याचं असणं बदलण्याची गरज नाही...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 9 July 2018

कसरत

जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणुस स्वतःचं जगणं विसरुन जातो...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 5 July 2018

समाधान

समाधान शोधावं लागत नाही, ते माणसाच्या चित्तातच सामावलेलं असतं...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 4 July 2018

प्रवास

पायांनी फक्त अंतरं कापता येतात, परंतु प्रवास पार पाडायला इच्छाशक्तीचीच गरज असते...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 2 July 2018

अंकुर

अंकुर जळण्याची भीती बाळगुन बी कधी रुजणं थांबवत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम