स्वाभिमान जिवंत व्हायला फक्त छोट्याशा अपमानाचीच गरज असते...
#जिंदगीडॉटकॉम
प्रत्येक नातं जुनं होताना नव्याने त्यातला अर्थ समजत जातो...
जगणं म्हणजे विणले तर ताकत अन् ताणले तर होणारा गुंता असतं...
जगण्याचा आनंद वागण्याच्या दर्जावर अवलंबुन आहे...
चिखलातुन वाटा काढणाऱ्या पायांचेच ठसे उमटत असतात...
स्वतःच्या पंखांवर विश्वास असणाऱ्यांना भरारी घेण्यासाठी आकाशही अपुरं पडतं...
जिथं आवाजाचा अर्थ समजतो तिथं शब्दांचा अर्थ समजुन घ्यायची गरज पडत नाही...
एकटक बघितलं की अंधारातील गोष्टी सुद्धा स्पष्ट दिसतात...
कितीही खोल असणाऱ्या गोष्टींना सुद्धा एक तळ असतोच...
आपल्याकडे कुणाचं लक्ष नसते हीच स्वतःकडे लक्ष देण्याची योग्य वेळ असते...
देवाला दगड करणारी लोकं एक दिवस दगडालाच देव करुन टाकतात...
जाणिवांचे झरे आटले की स्वार्थाचे पाझर फुटतात...
भावना मनाला एकांतात गाठुनच त्याच्याशी संवाद करतात...
ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांचं खरंतर वेळेचं नियोजन नसतं...
सैरभैर धावणाऱ्यांना दिशांचं भान नसतं...
सन्मान मिळवण्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं...
अहंकार सोडला की माणुस प्रेमास पात्र होतो...
जीवनात प्रत्येक वेळी नव्या चुका करत राहण्यातच आपली प्रगती असते...
निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसंही भेटत जातात...
जगण्याशी संघर्ष करण्यापेक्षा मैत्री केली की जगणं आनंददायी होऊन जातं...
पंखांमध्ये बळ आलं की पाखरं सुद्धा घरटं सोडतात...
आपलं दुःख विसरुन सर्वांच्याच जगण्यात आनंद भरणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य असतं..
मरणाची वेळ माहीत नसते तोपर्यंतच जगण्याचा खरा आनंद घेता येतो...
माणुसपण शोधण्याच्या प्रवासातच माणुसकीचा शोध लागतो...
जिंदगी नावाच्या शब्दाला अर्थपुर्ण बनवणारी अक्षरं आपल्या अवतीभोवतीच सापडतात...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम