जे जळण्यास तत्पर असतात तेच उजळण्यास कारणीभुत ठरतात...
#जिंदगीडॉटकॉम
वर्चस्वाच्या लढाईत नैतिकतेचा अंत होतो...
#जिंदगीडॉटकॉम #छत्रपतीसुत्र
नैतिकतेचा आधार असणारे निर्णय चुकत नाहीत...
उन्हाचा हिशोब जुळला की सावल्यांचं कोडं आपोआप सुटतं...
माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी कधी कधी माणसांशीच झगडावं लागतं...
एकमेकांना समजुन घेतलं असतं तर जगातली कित्येक नाती तुटलीच नसती...
परिस्थितीचे चटके बसल्याशिवाय माणसाची मनस्थितीही बदलत नाही...
सुर गवसलेल्या पारंब्यांना आभाळसुद्धा अपुरं पडतं...
कुठल्याही खेळात आनंद शोधणारं बालपण महागड्या खेळण्यांशिवायही आनंदी राहु शकतं...
केवळ श्वासांचं गणित म्हणजेच जगणं नसतं...
नात्यांना आकार देणं हेच सर्वाधिक कौशल्याचं काम असतं...
एकमेकांना समजुन घ्यायचं ठरवलं की वैयक्तीक दृष्टिकोन कधीच आडवं येत नाहीत...
भावनांचं आभाळ पापण्यांवर पेलता येत नाही...
संवेदना बोथट झाल्या की स्वार्थ बळकट होतात...
#जिंदगीडॉटकॉम #आक्रोश_बळीराजाचा
सुख आणि दुःखं कुणाकडेच मुक्कामाला थांबत नसतात...
प्रयत्नांना कधीही हार किंवा जीत नसते...
प्रत्येक मानवी मनाला स्वतःची अशी वेगळी स्वप्नं असतात...
आपल्या आयुष्यातील आनंदाची कमतरता आपणच भरुन काढावी लागते...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम