बघायला गेलं तर दुःख सुद्धा देखणं असतं...
#जिंदगीडॉटकॉम
जीवनातील कठीण काळातुन आठवणीत राहणारे क्षण निर्माण होतात...
शिखरावर उभं रहायचं असतं तेव्हा नशिबापेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवावा लागतो...
कर्तृत्ववान माणसांसाठी जगातल्या सगळ्याच नात्यांची दारं उघडी असतात...
जिद्दच माणसाला आयुष्यात उभं करत असते...
एक तारा निखळला म्हणुन आभाळ कधी रिकामं होत नाही...
आपलेपणाच्या नजरेत संशयाची प्रतिबिंब कधीच उमटत नसतात...
परिस्थितीपुढे हतबल होणारी माणसं आयुष्यात कधीच समतोल साधु शकत नाहीत...
समाधानाची व्याख्या स्वतःमध्येच शोधायची असते...
आयुष्याचं देऊळ बांधता येत आलं नाही म्हणुन त्याचं वारुळ बांधण्याचा प्रयत्न सोडायचा नसतो...
धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात...
क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा सादेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे...
अपेक्षांच्या मागे धावताना मैत्रीचे धागे सैल होऊन द्यायचे नसतात...
सावलीचा खरा अर्थ उन्हातुन गेल्याशिवाय समजत नाही...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम