Friday, 29 June 2018

स्वाद

जिंदगीचा मनसोक्त स्वाद घेतला की मरणाचीही चव बदलते...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 27 June 2018

वास्तव

वास्तव हे माणसाच्या जगण्याला चिकटलेलं असतं...

#जिंदगीडॉटकॉम

Tuesday, 26 June 2018

संधी

संधीची गाठ पडेपर्यंत संकटांसोबतच चालायचं असतं...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 24 June 2018

अस्तित्व

अस्तित्व निरर्थक असलं तरी कुणाच्यातरी जगण्याला त्यांनं अर्थ प्राप्त होत असतो...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 21 June 2018

अनुभवणं

पावसाला अनुभवणं मातीकडुन शिकावं लागतं...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 20 June 2018

परीक्षा

आयुष्य माणसाची परीक्षा घेत असते, त्याची उत्तरं माणसालाच शोधावी लागतात...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 18 June 2018

वाटचाल

मागे वळुन पाहिल्याशिवाय वाटचालीचा हिशेब लागत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 17 June 2018

वादळ

भावनांच्या वादळात मन आठवणींच्या मागं धावत राहतं...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 15 June 2018

एकटेपणा

एकटेपणाला आठवणीत रमायला आवडतं...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 14 June 2018

तडजोड

परिस्थितीच्या साच्यात तडजोडीचा आनंद आपसुक वाट्याला येतो...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 11 June 2018

प्रभाव

स्वभाव बदलत गेलो की प्रभाव बदलत जातो...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 9 June 2018

धागा

काचणारे धागे कधी ऊब देत नसतात...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 7 June 2018

बाजार

आयुष्य म्हणजे जगण्यासाठी मिळालेल्या मोजक्याच क्षणांचा बाजार आहे...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 3 June 2018

अगतिकता

अगतिकतेच्या वाटेवरचा प्रवास पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची गती वाढवावी लागते...

#जिंदगीडॉटकॉम

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम